www.24taas.com, झी मीडिया, अमेठी
प्रियांका गांधी वाराणसीत जाऊन प्रचार करण्याची दाट शक्यता आहे, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत.
प्रियांका गांधी 12 मे रोजी वाराणसीत जातील का, असं पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याला विचारण्यात आलं. यावर प्रियंका गांधी वाराणसीत प्रचाराला जाऊ शकतात, मात्र त्यांच्या प्रचार कार्यक्रम अजून निश्चित करण्यात आलेला नाही.
नरेंद्र मोदी यांनी काल अमेठीत जाऊन सभा घेतली, राजीव गांधींसह, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच एक अलिखित नियम तोडला, कारण राष्ट्रीय राजकारणातले नेते एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार सभा घेत नाहीत, असा अलिखित नियम आहे.
नरेंद्र मोदी यांनी अमेठीत गांधी परिवाराला आव्हान दिल्यानंतर, मोदींनी राजीव गांधी यांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. मोदींनी खालच्या थराला जाऊन टीका केल्याने अमेठीची जनता मोदींना माफ करणार नसल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.
तत्कालीन आंध्रचे मुख्यमंत्री राजीव गांधी यांचं स्वागत करण्यासाठी एअरपोर्टवर आले नाहीत, म्हणून मुख्यमंत्र्यांना राजीव गांधींनी रडवलं होतं, असा दाखला मोदींनी अमेठीच्या सभेत दिला होता. यावरून मोदींनी राजीव गांधींचा अपमान केला, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.