www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढले. निवडणुकीच्या भाषणामध्ये बडाटे वडे आणि चिकन सूप काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणामध्ये असं करण योग्य नाही. राज ठाकरे हे महायुतीसोबत येणार नाहीत आणि आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, असा टोला रिपाई नेते रामदास आठवले यांनी राज यांना लगावला.
राज मला म्हणतात, लालू. मी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भालू म्हणणार नाही, अशी मार्मिक टीका आठवले यांनी केली. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आठवले यांच्यावर टीका केली. आठवले हे सत्तेसाठी आहेत. स्वत:साठी ते पदे घेत आहेत. मात्र, कार्यकर्त्यांना काहीही मिळत नाही, या टीकेवर त्यांनी राज यांना आपल्या कवितेतून चिमटे काढले. राज ठाकरेंना इतिहास माहित नाही. मी जरी मंत्री झालो तरी माझ्यानंतर तीन मंत्री झालेले आहेत. मुंबईचा महापौर झालेला आहे. मी एकट्यासाठी काहीही केलेलं नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. तरीही ते माझ्यावर टीका करीत आहे. का माझ्यावर त्यांचा राग आहे, हे समजत नाही, असं आठवले म्हणालेत.
लालू हे बिहारचे स्ट्राँग नेते आहेत. त्यामुळे मला राज लालू म्हणत असतील तर मीही महाराष्ट्राचा स्टाँग नेता आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे खरं आहे. मी त्यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. ते माझ्यावर का टीका करत आहेत, ते मला माहिती नाही. मी राज ठाकरेंना भालू आणि चालू म्हणणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया टीकेला उत्तर देताना रामदास आठवले यांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ