www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
युतीसंदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात युती अभेद्य असल्याचा दावा केलाय. तसेच उद्धव ठाकरेंची ते प्रत्यक्ष भेट घेणारेत.
दरम्यान फडणवीसांनी घेतलेल्या भेटीबाबत बोलण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला असून याबाबत गुप्त बैठक घेतल्यानंतर माहिती देणार असल्याचा टोला त्यांनी मनसे-भाजपला लगावलाय.
भाजप आणि मनसेतल्या वाढत्या जवळीकीमुळं नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धावाधाव सुरू झालीयं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहेत.
शिवसेना हा भाजपचा विश्वासू सहकारी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर ट्विटरवरून व्यक्त केलीय.
तर दुसरीकडे शिवसेनेची बैठक ही केवळ जागांच्या मोर्चेबांधणीसाठी असून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद नाहीत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.