रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणेंविरोधात राष्ट्रवादीचे बंड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सिंधुदुर्गातला संघर्ष वाढला आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र खासदार नीलेश राणे यांनी गेली साडे चार वर्षे राष्ट्रवादीला त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यात या दोन पक्षाची आघाडी झाली असली तरी आम्ही सिंधुदुर्गात काँग्रेसला मदत करणार नाहीत, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीने घेतली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2014, 09:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
कोकणातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार नीलेश राणेंविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय. तर नीलेश राणे यांनी रत्नागिरीची पालकमंत्री यांच्यावर विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप केलाय.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सिंधुदुर्गातला संघर्ष वाढला आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र खासदार नीलेश राणे यांनी गेली साडे चार वर्षे राष्ट्रवादीला त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यात या दोन पक्षाची आघाडी झाली असली तरी आम्ही सिंधुदुर्गात काँग्रेसला मदत करणार नाहीत, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीने घेतली आहे.
प्रसंगी आम्ही नकाराधिकाराचा वापर करू असा निर्णय घेण्यात आला असून पवारांचेही आदेश पळणार नसल्याचं कार्यकारिणीनं स्पष्ट केलंय. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नितीन वाळके आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजा गावकर यांनी तशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे सिंधुदुर्गातील निवडणुकीतील काँग्रेस समोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आघाडीत संशयकल्लोळ निर्माण झालाय. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांची पालकमंत्री उदय सामंत यांनी बंद खोलीत भेट घेतल्याचा आरोप खासदार नीलेश राणे यांनी केलाय. चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केलाय. राऊत आणि सामतांनी बैठकीतला तपशील उघड करावा, अशी मागणी निलेश राणे यांनी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ