`जास्त पैसे मोजणार त्याचाच प्रचार करणार`

`मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की...` असं म्हणणारी पिंकी आठवतेय का? ही `पैसेवालों की पिंकी` आठवण्याचं कारण म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचं नुकतंच आलेलं एक वक्तव्य...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 6, 2014, 10:15 PM IST

www.24taas, झी मीडिया, ठाणे
`मुंबई की ना दिल्ली वालों की पिंकी है पैसे वालों की...` असं म्हणणारी पिंकी आठवतेय का? ही `पैसेवालों की पिंकी` आठवण्याचं कारण म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचं नुकतंच आलेलं एक वक्तव्य...
`टाईमपास`फेम सई ताम्हणकर आता मराठी चित्रपटसृष्टीतील तरुणांच्या हृदयाची धडकन बनलीय... पण, निवडणूक आणि प्रचाराविषयी जेव्हा सईला प्रश्न विचारला गेला तेव्हाचं उत्तर मात्र सगळ्याच उपस्थितांना थक्क करणारं होतं...
`निवडणुकीच्या काळात जो पक्ष जास्त पैसे देईल त्यांचा प्रचार करेन` असं सई ताम्हणकरने म्हटलंय. सोबतच, निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्रलोभनं दाखवू नयेत असंही ती म्हणाली.
ठाण्यात लागू बंधू दुकानामध्ये एका कार्यक्रमानिमित्त सई ठाण्यात आली होती. सईच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र त्याची पर्वा नसल्याचं सई म्हणते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.