www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक एकूण नऊ टप्प्यात पार पडली. आता 16 मे या दिवशीच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक बॉलिवूडस्टार उतरले आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींची हवा केली गेली आहे. काँग्रेसचं काय होणार, आम आदमी पार्टी काय चमत्कार करणार याची चर्चा रंगत आहेत. तर महाराष्ट्रात मनसे खाते खोलणार का, दक्षिणेकडे नवे तेलंगणा राज्य आणि अन्य राज्यांत काय होणार याची उत्सुकता आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममतांना कौल मिळणार की डावे आघाडी घेणार याचीच जोरदार चर्चा आहे. उत्तर प्रदेशकडे सर्वाधिक 80 जागा असल्याने कोणाला किती जागा मिळतात याची उत्सुकता शिगेला आहे.
एक्झीट पोलनुसार देशात नरेंद्र मोदींचे सरकार येणार आहे. एनडीएला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. एनडीए ला 261-283, यूपीए ला 110-120 आणि अन्य 150-162 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इंडिया टीव्हीने एनडीएला 289, यूपीएला 101, `आप` ला 5 आणि अन्य 148 जागा मिळतील असा दावा केला आहे. तर टाइम्स नाऊ ओआरजीने एनडीएला249 आणि यूपीएला 148 जागा दिल्या आहेत. मात्र, काँग्रेसने आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत 114 पेक्षा कमी जागा मिळविलेल्या नाहीत.
एबीपी न्यूज-नीलसनच्या एक्जीट पोलनुसार उत्तर प्रदेश बीजेपीला 46,काँग्रेसला 8, बीएसपीला 13, एसपीला 12 ,अन्य 1, बिहार बीजेपीला 21, एलजेपीला 2 , काँग्रेसला 4 , आरजेडीला 10, जेडीयूला 5, महाराष्ट्रात बीजेपीला 21, शिवसेना 11 , काँग्रेस 9, एनसीपी 6 ,आप 1 तर पश्चिम बंगालमध्ये बीजेपीला - 1 कांग्रेस- 5 , टीएमसी- 24 , लेफ्ट- 12 तसेच गुजरातमध्ये बीजेपीला 24 कांग्रेस 2 अन्य 0 असे आकडे दिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये बीजेपीला 26 , कांग्रेस 3 अन्य 0 तर छत्तीसगडमध्ये बीजेपी 10 , कांग्रेस 1, अन्य 0. राजस्थानमध्ये बीजेपीला 22 , कांग्रेस 2 अन्य 1. झारखंडमध्ये बीजेपीला 12 , कांग्रेस 1 , अन्य 1
तर सी वोटर का एग्जिट पोल एनडीए 289 , यूपीए 101, आम आदमी पार्टी 5, आज तक-सिसेरो के एग्जिट पोलनुसार दिल्ली काँग्रेस 0, बीजेपी 5-7 ,आप 0-2 अन्य 0 . राजस्थानात बीजेपीला 21-25 काँग्रेस 0-4 अन्य 0-1. हरियाणा एनडीए 7-9 यूपीए 0-2 अन्य 0-2 कर्नाटक बीजेपी 6-10 कांग्रेस 15-19 जेडीएस 2-4 अन्य 0 टाइम्स नाऊ-ओआरजी यूपी बीजेपी 52 बीएसपी 6 एसपी 12 काँग्रेस 10. मध्य प्रदेश बीजेपीला 16 काँग्रेस 11 अन्य 2. दिल्लीत बीजेपीला 6 काँग्रेस 1, पंजाबमध्ये काँग्रेस 6 एनडीए 7 , बिहार एनडीए 27 यूपीए 1 जेडीयू 6, सीमांध्र एनडीए 17 काँग्रेस 0 वाईएसआर काँग्रेस 8 लेफ्ट 0 अन्य 0 . तेलंगाना काँग्रेस 4 बीजेपी 2 टीआरएस 9 लेफ्ट 2 , पश्चिम बंगाल काँग्रेस- 5 बीजेपी- 2 टीएमसी-20 लेफ्ट-15 . झारखंड काँग्रेस+ 6 बीजेपी-7 जेबीएसपी-1 अन्य-0 ओडिशा काँग्रेस+ 5 बीजेपी 1, बीजेडी 15, मिजोरम काँग्रेस 1 , कर्नाटक बीजेपी 18 , कांग्रेस 9 जेडीएस 1, अन्य 0. मेघालय एनडीए 1 यूपीए 1 मणिपूर यूपीए 1 , अरुणाचल प्रदेश एनडीए 1 , यूपीए 1.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.