दिग्विजय-अमृताचं लग्न होणार?

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह आणि न्यूज अँकर अमृता राय यांच्या प्रेमप्रसंगाची चर्चा चव्हाट्यावर सुरू झाली... त्यानंतर दोघांनीही आपलं प्रेम जगासमोर जाहीर केलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 13, 2014, 10:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह आणि न्यूज अँकर अमृता राय यांच्या प्रेमप्रसंगाची चर्चा चव्हाट्यावर सुरू झाली... त्यानंतर दोघांनीही आपलं प्रेम जगासमोर जाहीर केलं. पण, आता मात्र दिग्विजय-अमृता यांचं ‘होणाऱ्या’ लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय... आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रश्नचिन्ह दुसरं-तिसरं कुणी नाही तरी खुद्द दिग्गीराजांनीच उपस्थित केलंय.
आपली ‘रासलीला’ जगासमोर आल्यानंतर पहिल्यांदाच दिग्विजय सिंग आपले गुरु आणि ज्योतिषी द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांची भेट घेतली. यासाठी त्यांनी परमहंसी गंगा आश्रमाचा दोन दिवसांचा दौराही केला.
दिग्विजय यांनी शंकराचार्यांची दोन वेळा भेट घेतली पण दोन्हीही वेळा त्यांनी या विवाहास नकार दिलाय. खुद्द दिग्विजय यांनीच याची वाच्यता केली. `मी गंगा आश्रमावर शंकराचार्यांची भेट घेतली. आम्ही २० मिनिटे एकांतात चर्चा केली. माझ्याकडून झालेल्या काही चुकांबद्दल मी क्षमाही मागितली. मात्र, अमृताशी विवाह करण्यासाठी मला शंकराचार्यांचा आशीर्वाद मिळाला नाही`, असं दिग्गीराजा म्हणतायत. रविवारी दुसऱ्यांदा शंकराचार्यांना भेटलो. त्यावेळीही माझ्या पदरी नकारच पडला. मी सामाजिक कार्यासाठी आशीर्वाद देतो. अन्य गोष्टींसाठी नाही, असं आपल्याला शंकराचार्यांनी सांगितल्याचंही दिग्विजय यांनी म्हटलंय.
दुसरीकडे, अमृता राय मात्र आपल्या पतीसोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. एकीकडे अमृता तर दुसरीकडे आपले गुरु अशा द्वंद्वामध्ये आता दिग्विजय सिंग फसलेत. त्यामुळेच, दिग्गीराजांच्या हालचालींकडे लक्ष असलेल्या प्रत्येकाचं लक्ष आता त्यांच्या पुढील निर्णयावर लागलंय.

'फेसबुक'वर अमृता राय यांचे पती आनंद प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती... ती अशी..

.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.