www.24taas.com, झी मीडिया, सातारा
भाजपला किती जागा मिळतील, मोदींची जादू मतदारांवर चालली असेल का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
मात्र गेल्या चार- पाच लोकसभा निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
तसेच या निवडणुकीत भाजपच्या जागांच्या आसपास काँग्रेसला जागा मिळतील, अशा वेळी धर्मनिरपेक्ष आणि किमान समान कार्यक्रमाला मान्यता असणारे पक्ष एकत्र येऊन संयुक्त सरकार स्थापन करतील, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साताऱ्यात व्यक्त केले.
राज्यातील आगामी विधानसभा दोन्ही काँग्रेस एकत्र लढवतील, याचा पुनरुच्चारही पवार यांनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.