www.zee241taas.com, झी मिडीया, अलिबाग
शेतकरी कामगार पक्षानं शिवसेनेबरोबरचा घरोबा तोडलाय. गेल्या काही निवडणुकांमधली एकमेंकांबरोबरची सहकार्याची भूमिका सोडून शेकापनं शिवसेनेच्या विरोधात लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केलेत.
रायगड आणि मावळची जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षानं घेतलाय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांना शेकापनं उमेदवारी दिलीय. रायगडमधून चिपळूणमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम तर मावळमधून राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीय.
नव्या राजकीय समिकरणामुळं हा राष्ट्रवादीला झटका आहे की राष्ट्रवादीचीच खेळी आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय. तर दुसरीकडे गेल्यावेळी रायगडमध्ये शिवसेनेनं शेकापसोबत निवडणूक लढवल्यानं यंदाची निवडणूक शिवसेनेला जड जाणार की काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.