राज ठाकरेंच्या घरासमोर ‘चिटपाखरू’ नाही

निवडणुका म्हटलं की जिथे प्रचंड लगबग असायची..... कार्यकर्त्यांची गर्दी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची व्हिज्युअल्स घेण्याची धडपड सुरू असायची..... कुणीही नेता त्या भागाच्या आसपास जरी फिरकला तरी ब्रेकिंग न्यूज व्हायची..... आता तिथं सारं काही शांत आहे..... आम्ही बोलतोय कृष्णकुंजबद्दल...... पाहुयात सध्या कृष्णकुंजवर काय सुरू आहे.....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 20, 2014, 07:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
निवडणुका म्हटलं की जिथे प्रचंड लगबग असायची..... कार्यकर्त्यांची गर्दी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची व्हिज्युअल्स घेण्याची धडपड सुरू असायची..... कुणीही नेता त्या भागाच्या आसपास जरी फिरकला तरी ब्रेकिंग न्यूज व्हायची..... आता तिथं सारं काही शांत आहे..... आम्ही बोलतोय कृष्णकुंजबद्दल...... पाहुयात सध्या कृष्णकुंजवर काय सुरू आहे.....
एरवी सतत गजबजलेल्या कृष्णकुंजची ही दृश्यं...... चिडीचूप शांतता, प्रचंड शुकशुकाट आणि अभूतपूर्व सन्नाटा..... देशात लोकशाहीचा उत्सव सुरू असताना कृष्णकुंजच्या बाहेर साधं चिटपाखरुही नाही...... लोकसभेचे निकाल लागून ४८ तास उलटून गेलेत तरी कृष्णकुंजची हीच परिस्थिती आहे..... महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे कृष्णकुंजमध्येच आहेत पण साहेब कुणालाही भेटत नाहीत, काही बोलत नाहीत, फोन उचलत नाहीत.... कृष्णकुंजवर असूनही सध्या राजसाहेब नॉट रिचेबल आहेत.....
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचाही दारुण पराभव झाला.... पण त्यानंतर आघाडीनं चिंतन मनन सुरू केलं.. पराभवाची जबाबदारी स्वीकारली.... निराशा झटकून कामाला लागण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले..... पण कृष्णकुंजवरचा चाफा काही केल्या हालेना आणि बोलेना..... ते अजून खंतच करत बसलेत.
मुळात मनसेचं करिअर उणंपुरं ८ वर्षांचं..... या आठ वर्षांत मनसेनं पराभवाची चव फारशी चाखलेलीच नाही.... त्यामुळे हा मानहानीकारक पराभव पचवायचा कसा..... याची गणितं कधी सोडवलेलीच नाहीत..... लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी मनसेला इतकं आस्मान दाखवलं की मनसेच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं.....
गेल्या लोकसभा निवडणुकीत लाखांनी मतं खाऊन कितना सॉलिड मारा म्हणणा-या पक्षाची मतं अशी काही घटली की तोंड दाखवायची सोय नाही....
मुंबई उत्तर पूर्वमध्ये गेल्या वेळी 1 लाखांवर असलेली मतं आता फक्त ६६ हजारांवर आली.
मुंबई दक्षिण मध्यमध्येही लाखांची मतं 73 हजारांवर आली
दक्षिण मुंबईत दीड लाखापेक्षा जास्त मतं खाणा-या मनसेला यंदा लाखही गाठता आले नाहीत
ठाण्यातही मनसेची मतं निम्मी झाली
नाशिकमध्ये ३ आमदार आणि सत्ता असतानाही दोन लाखांचा आकडा 63 हजारांवर गेला

आता अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे पाहून लढायचं ते राजसाहेब काहीच भूमिका मांडत नाहीत. आमदार धीर देत नाहीत.... पराभवाचं शल्य घेऊन साहेब किंवा आमदार थंड हवेच्या ठिकाणी जाऊन स्वतःचं सांत्वन करतीलही..... पण कायम जमिनीवरुन लढणा-या कार्यकर्त्यांनी काय करायचं.... असा मोठा प्रश्न आहे....
मनसेचे कार्यकर्ते घरी बसले तर पराभवावरुन घरचे टोमणे मारतात, नाक्यावर गेलं तर लोक टोमणे मारतात आणि मोबाईल उघडला तर मनसेच्या पराभवाची खिल्ली उडवणारे मेसेजेस धुमाकूळ घालतायत. त्याहून कडी म्हणजे बघा, अजूनही वेळ गेलेली नाही, असं म्हणत शिवसैनिक चेष्टा करतात. अशा परिस्थितीत राजानं शस्त्र गाळल्यानं कार्यकर्त्याचा जीव जातोय.... महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.... अशा वेळी साहेबांनी काहीच भूमिका मांडली नाही.... तर कार्यकर्त्यांसमोर कोणता झेंडा घेऊ हाती..... याचा पुन्हा विचार करण्याची वेळ आली तर आश्चर्य वाटायला नको....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.