पंतप्रधानांच्या फेअरवेल पार्टीला राहुलची दांडी!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी फेअर वेल डिनरचं आयोजन केलं. सोनियांच्या दिल्लीतल्या 10 जनपथ या निवासस्थानि आयोजित केलेल्या या डिनर पार्टीला युपीए-2 सरकारमधले केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, चिरंजीवी आणि काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 15, 2014, 08:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी फेअर वेल डिनरचं आयोजन केलं. सोनियांच्या दिल्लीतल्या 10 जनपथ या निवासस्थानि आयोजित केलेल्या या डिनर पार्टीला युपीए-2 सरकारमधले केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, चिरंजीवी आणि काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान सोनिया गांधींनी यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा खास सत्कार केला. डिनरसाठी सपत्निक उपस्थित असलेल्या मनमोहन सिंहांना यावेळी एक खास स्मृतिचिन्ह देण्यात आलं.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारली. राहुल गांधी परदेशात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं असलं तरी त्यांच्या अनुपस्थीती चर्चेचा विषय ठरली.
एग्झिट पोलचे निष्कर्ष काँग्रेसनं अधिकृतरीत्या स्वीकारले नसले तरी पक्षातील नेत्यांमध्ये त्यामुळं नैराश्य आलेलं आहे. त्यातच सोनियांनी पंतप्रधानांना दिलेल्या डिनर पार्टीला राहुल गांधी अनुपस्थित असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.