www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
समाजवादी पार्टीने लोकसभेच्या २२ जागा राज्यात लढणार असून १३ उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीने (बसपा) शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे. कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
बिग बॉस या टीव्ही शोमुळे चर्चेत आलेले कमाल खान यांना उत्तर-पश्चिम मुंबईत उमेदवारी दिली आहे. चित्रपट निर्माते आणि अभिनेते असलेले कमाल खान यांच्या देशद्रोही या चित्रपटामुळे मनसे-समाजवादीमध्ये जुंपली होती. उत्तर-पश्चिम मुंबईत काँग्रेसचे नेते गुरुदास कामत, शिवसेनेचे गजानन कीर्तिकर आणि चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक असलेले मनसेचे महेश मांजरेकर मैदानात आहेत.
उत्तर मुंबईतून काँग्रेसचे संजय निरुपम विरुद्ध भाजपाचे आमदार गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध सपाने हिंदी भाषिक असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांना उमेदवारी दिली. उत्तर-पूर्व मुंबईत पक्षाचे महापालिकेतील गटनेते रईस खान यांना संधी देण्यात आली आहे. आपण स्वत: भिवंडी किंवा मालेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.
सपा यादी
- उत्तर पश्चिम मुंबई- कमाल खान
- दक्षिण मध्य मुंबई- काशिनाथ पासी
- उत्तर मुंबई- कमलेश यादव
- उत्तर पूर्व मुंबई- रईस खान
- वर्धा- अंकुश नवले
- अहमदनगर- राजेंद्र पवार
- यवतमाळ-वाशिम- परवेज सिद्दीकी,
- गडचिरोली-चिमूर- विनोद ननावरे
- जालना- कुंजबिहारी अग्रवाल
- भंडारा-गोंदिया- रामेश्वर ठाकरे
- रामटेक- माया चौरे
- बीड- माणिकराव सवाने
- नांदेड- बाळासाहेब मोरे
बसपाची दुसरी यादी
अकोला जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री दशरथ भांडे रावेरमधून निवडणूक लढवतील.
-दिंडोरी- शरद माळी
- नागपूर- डॉ. मोहन गायकवाड
- रामटेक- गायिका किरण पाटणकर
- भंडारा- संजय नासरे
- अमरावती- रवींद्र वैद्य
- हातकणंगले- संग्रामसिंह गायकवाड
- कल्याण- अशफाक अली सिद्दीकी
- पालघर- प्रकाश सावर
- पुणे- इम्तियाज पिरजावे
- शिरूर- सज्रेराव वाघमारे
- सोलापूर- अँड. संजीव सदाफुले
- सातारा- प्रशांत चव्हाण
- रत्नागिरी- राजेंद्र आवरे
- जालना- डॉ. शरदचंद्र वानखेडे
- परभणी- गुलमीर खान
- उस्मानाबाद- पद्मशील ढाले
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.