मोदींवर हल्ल्यासाठी दहशतवादी तयार

इंडियन मुजाहिद्दीन आणि `सिमी`या दहशतवादी संघटनांकडून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धोका निर्माण झाला आहे.

Updated: Apr 29, 2014, 12:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
इंडियन मुजाहिद्दीन आणि `सिमी`या दहशतवादी संघटनांकडून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धोका निर्माण झाला आहे. मोदींवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी ३० `स्लिपर सेल` तयार झाले आहेत.
मुजाहिद्दीनचा दहशतवादी तेहसीन उर्फ मोनू अख्तर आणि इम्तियाज अन्सारी यांनी हि माहिती उघड केली आहे. मोदींवर हल्ला होणार ही माहिती मिळताच, देशातील सर्व तपास यंत्रणांना `हाय अलर्ट`वर ठेवण्यात आले आहे. तसेच हल्ला चढवू शकणाऱ्या सर्व ३० `स्लिपर सेल`चा कसून तपास सुरू झाला आहे. दिल्लीतील यंत्रणांना तपास करण्यास अडचण येऊ नये, म्हणुन देशातील सर्व दहशतवाद्यांना दिल्लीला हलवण्यात येत आहे. परंतू अजून महाराष्ट्रातील एकाही दहशतवाद्यास दिल्लीला नेण्यात आलेले नाही.
या आधीच मोदींच्या हुंकार रॅलीत मोनूने बॉम्बस्फोट घडवला होता. मोनूला अटक केल्यावर, तपास यंत्रणांनी अन्सारीला अटक केली. अन्सारीच्या चौकशीतच ३० `स्लिपर सेल`ची माहिती तपास यंत्रणांना दिली. तसेच मध्य प्रदेशातील अबू फैजल आणि त्याच्या साथीदारानींही मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या नंतर अबू फैजलला अटक करण्यात आली होती. अबूच्या साथीदारांची फळी ही महाराष्ट्रातील सोलापूर पर्यंत पोहचली होती. या कारणाने यंत्रणांनी सोलापुरमध्ये अबूच्या चार साथीदारांना अटक करून स्फोटके देखील जप्त केली होती. विशेष म्हणजे `सिमी`या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे, तरी देखील हि संघटना गूप्तपणे कार्यरत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.