पुण्यातील तीन बड्या नेत्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय. जिल्हयातील शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. माजी जिल्हा प्रमुख उमेश चांदगुडे, उपजिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, शरद सोनावणे यांनी सेनेला रामराम ठोकलाय.

Updated: Mar 7, 2014, 06:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय. जिल्हयातील शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. माजी जिल्हा प्रमुख उमेश चांदगुडे, उपजिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, शरद सोनावणे यांनी सेनेला रामराम ठोकलाय.
यापैकी खांडेभराड यांनी मनसे मध्ये प्रवेश केलाय. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी खांडेभराड यांनी मनसेत प्रवेश केला. इतर दोन नेत्यांनी त्यांची पुढील दिशा स्पष्ट केलेली नाही. मात्र हे नेते देखील मनसेच्या वाटेवर असल्याचे समजते.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे या नेत्यांनी शिवसेना सोडण्यामागाचे कारण आहे. आढळराव पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसेना सोडली असा आरोप या नेत्यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातेय. विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील यांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
या नेत्यांच्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील इतरही काही नेते शिवसेना सोडण्याची शक्यता आहे. शिवसेना सोडलेले हे नेते भोसरी, खेड आणि जुन्नर या मतदार संघातील आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात आढळराव पाटील यांना मोठा फटका बसणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मनसेची ताकत या पक्ष प्रवेशामुळे वाढणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.