जळगावात आज नरेंद्र मोदींची सभा

राज्यात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २४ एप्रिलला होणार आहे. त्यात सुट्टीच्या रविवारी मतदारांपर्यंत पोहण्यासाठी राजकीय पक्षांच्या सभा आयोजित करण्यात आल्यात.

Updated: Apr 20, 2014, 11:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २४ एप्रिलला होणार आहे. त्यात सुट्टीच्या रविवारी मतदारांपर्यंत पोहण्यासाठी राजकीय पक्षांच्या सभा आयोजित करण्यात आल्यात.
खान्देशातही प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आज जळगावात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होते आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार ए. टी. पाटील तसंच रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मोदी जळगावात येताहेत.
सभेसाठी सुमारे ६ लाख चौरस फुट एवढ्या जागेवर २० बाय २० फुट आकाराचे व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलंय.
रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनीष जैन निवडणूक लढवत आहेत, जळगाव मतदार संघातून भाजपचे उमेदवार एटी पाटील आहेत. एटी पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे डॉ.सतीष पाटील निवडणूक लढवत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.