ब्रिगेडिअर. हेमंत महाजन
www.24taas.com, मुंबई
जन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारं आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे.
पंजाबमध्ये १९८२ ते १९९१ हे दशक भीषण हिंसाचाराने भरलेले होते. या काळात तिथे कित्येक हिंसक घटना घडल्या आणि त्यात हजारो लोक मारले जाऊन कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आता पुन्हा एकदा तिथे अशाच प्रकारच्या काळ्या दशकाची सुरुवात होते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. कारण तसं वातावरण तिथे तयार केलं जातंय. लंडनमध्ये निवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. ब्रार हे १९८४ मध्ये झालेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईत गुंतलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचा हा प्रयत्न होता. वास्तविक पाहता ही लष्करी कारवाई होऊन २७ वर्षे उलटली आहेत. पण अजूनही खलिस्तानवादी शीख अतिरेक्यांच्या मनातील बदल्याची आग शमलेली नाही. ते अशा घटनांमधून पुन्हा एकदा दहशतवादाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. ले. ज. के. एस. ब्रार यांच्यावरील हल्ल्याला आठवडाही उलटला नाही, तोच अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जनरल वैद्य यांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांचा गौरव करण्यात आला.
ओपरेशन टोपेज
बांगलादेश युद्धातील दारुण पराभवानंतर भारताशी सरळ लढय़ात आपण जिंकणार नाही, हे पाक लष्करानं ओळखलं होतं. म्हणूनच ‘छुप्या युद्धा’ची रणनीती आखण्यात आली होती. ती अंमलात आणण्याची पहिली संधी झैलसिंह व संजय गांधी यांच्या कुटिल डावपेचांमुळे पाकला मिळाली. असंख्य शीख तरुण पाकमध्ये गेले. पाकनं त्यांना शस्त्रं दिली... पैसे पुरवले. नंतर पाच वर्षे उत्तर भारतात खलिस्तानवाद्यांनी धुमाकूळ घातला. अनेकांचे खून पाडण्यात आले. पंजाबातील पोलीस व सरकारी यंत्रणा हतबल झाली. गुरुद्वारा प्रबंधक समितीनं भिन्द्रनवाले याच्यापुढे हात टेकले. त्यानं सुवर्णमंदिरात ठाण मांडलं. या शिखांच्या पवित्र मंदिरात त्यानं सशस्त्र मोर्चेबांधणी केली. बांगलादेश युद्धात सहभागी असलेले भारतीय लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल सुभग सिंह हे भिन्द्रनवाले याचे साथीदार बनले होते. त्यांनी लष्करी पद्धतीनं ही मोर्चेबांधणी उभारली. तेथून स्वतंत्र खलिस्तानची घोषणा करायची आणि पाक त्याला मान्यता देणार, असा बेत आखण्यात आला होता. तेव्हा अखेर इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचा आदेश दिला. मग, पुढचं सगळं रामायण घडलं. त्यात इंदिरा गांधी व जनरल वैद्य यांचा बळी गेला.
दहशतवाद्यांचे उदात्तीकरण
सत्तेच्या राजकारणामुळे तीन दशकांपूर्वी खलिस्तानचा प्रश्न भीषण बनला. पाकनंही त्याचा फायदा घेतला. राज्यसंस्थेचं अस्तित्वच जाणवेनासं झालं की काय होतं, त्याची प्रचिती आपल्या देशात सध्या येत आहे. सर्वत्र अनागोंदी, अराजक, अनास्था असं वातावरण आहे. अशा वेळी ज्या अनेक घटना घडत आहेत, त्याकडे फारसं गांभीर्यानं लक्षही दिलं जात नाही. मग त्याचा फायदा आपल्या देशाचे शत्रू घेणारंच.
जनरल वैद्य यांची कारवाई संपल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८६ साली पुण्यात त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येच्या आरोपावरून हरजिंदर सिंग जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा या दोघांना फाशी देण्यात आली. वास्तविक पाहता हे दोघेही दहशतवादी सदरात मोडणारे हत्यारे होते. परंतू शीख समुदायातील दहशतवादी प्रवृत्तीचे लोक या दोघांना हुतात्मा, शहीद म्हणत असतात. त्यांना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने उपाधीही दिलेली आहे. १९९९ पासून या दोघांचा स्मृतिदिन ‘अकाल तख्ता’तर्फे साजरा केला जात असतो. अशा कार्यक्रमामध्ये अकाल तख्तातर्फे या दोघा मारेकऱ्यांच्या नातेवाइकांचा खास शिरोपा देऊन सत्कार करण्यात आला. जिंदाचा भाऊ आणि सुखाची आई या दोघांचा सत्कार करण्यात आला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात १९८४ च्या लष्करी कारवाईची स्मृती जतन करण्यासाठी स्मारक उभारले जात आहे. या गोष्टी खेदजनक आहेत. केंद्र सरकार अशा लोकांवर कारवाई करत नाही. अकाली दलाचे नेते अप्रत