इंटरनेट आलं त्यांनी जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला, क्षणार्धात एका ठिकाणाची बातमी दुसऱ्या ठिकाणी यासारख्या गोष्टी सहजपणे होऊ लागल्या. त्यातच आजची तरूणाई तर इंटरनेटच्या आहारीच गेलेली... एका अर्थी ही गोष्टी चांगलीही आहे. देशाचा उत्कर्ष यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे.
पण याच इंटरनेटचा आज किती मोठ्या प्रमाणात दुरूपयोग होतोय हे देखील दिसून येतं. आज सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे 'फेसबुक'. कारण की फेसबुकने आज अक्षरश: तरूणाईला वेड लावलं आहे. त्यामुळे आज लहांनापासून ते थोरापर्यंत सगळ्यांचाच मनावर या फेसबुकची मोहिनी आहे. म्हणजेच ज्याप्रकारे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसेच तोटेही.
प्रसारण मंत्री कपिल सिब्बल यांनी यामुळेच फेसबुक किंवा त्यासारख्या इतर सोशल नेटवर्किंग साईटवर काही बंधने असली पाहिजेत यासाठीच या कंपन्यांशी बोलणी सुरू केल्याचे कळते. त्यामुळेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला. फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईटमुळे क्रांती झाली अशा वावड्या भारतात उठत होत्या. पण याच सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह आणि अश्लील असा मजकूर प्रसिद्ध होतो. आणि यांमुळे आजची तरूण पिढी पूर्णपणे भरकटत आहे.
तसंच आताच काही दिवसापूर्वी शरद पवारांना झालेली मारहाण यांचे अत्यंत विकृत पद्धतीने चेष्टा करण्यात आली होती. त्यामुळे सरकारचं फक्त इतंकच म्हणंण आहे की यासारख्या गोष्टींना फक्त आळा घातला गेला पाहिजे. भारतात या सोशल मीडियावर काहीही बंधने नाहीत मात्र आक्षेपार्ह मजकूरावर बंधने आली पाहिजेत. आणि यामुळे सगळ्यांनाच एकप्रकारे शिस्त लागेल
शब्दांकन- रोहित गोळे