LIVE : विधानसभा निवडणूक २०१२

गुजरातच्या १८२ मतदारसंघांपैकी १३ अनुसूचित जातींसाठी व २६ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत, तर हिमाचल प्रदेशच्या ६८ मतदारसंघांपैकी १७ अनुसूचित जातींसाठी व ३ जमातींसाठी राखीव आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 20, 2012, 05:24 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात तर हिमाचल प्रदेशच्या ६८ जागांसाठी ही ही मतमोजणी होतेय. गुजरातमध्ये तीन कोटी ७८ लाख १५,३०६ मतदार असून हिमाचल प्रदेशमध्ये ४५ लाख १६०५४ मतदार आहेत. गुजरातच्या १८२ मतदारसंघांपैकी १३ अनुसूचित जातींसाठी व २६ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत, तर हिमाचल प्रदेशच्या ६८ मतदारसंघांपैकी १७ अनुसूचित जातींसाठी व ३ जमातींसाठी राखीव आहेत.
... अशी झाली मोदींच्या विजयाची घोषणा
सकाळी ११.५० वाजता हा विजय केवळ मोदी किंवा भाजपचा नाही तर हा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय - किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
सकाळी ११.३० वाजता गुजरातमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन चांगलं, आम्ही भाजपच्या जागा कमी केल्या – पी. चिंदबरम यांची प्रतिक्रिया |
सकाळी १०.५० वाजता : भाजपनं फोडला विजयाचा नारळ | गुजरातच्या मणिनगरमधून नरेंद्र मोदी विजयी | पहिल्या जागेवर भाजपचा विजय जाहीर
सकाळी १०.३५ वाजता : गुजरातच्या सगळ्या जागांवरचे कल हाती | केशुभाई पटेल ३००० मतांनी आघाडीवर तर नरेंद्र मोदी ४७,००० मतांनी आघाडीवर | गोध्रामध्ये भाजप आघाडीवर |
सकाळी १०.२० वाजता : नरेंद्र मोदी ४०,००० मतांनी आघाडीवर | २००७ च्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढणार | गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्चित | मात्र जागा घटणार | २००७ च्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढणार
सकाळी १०.१२ वाजता : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष | भाजप ११०, काँग्रेस ५७, जीपीपी ४ आणि इतर २
सकाळी १० वाजता : गुजरातचं चित्र स्पष्ट | भाजपनं पार केला शंभरीचा आकडा | १०१ जागांवर आघाडी | भाजप सलग पाचव्यांदा सत्तेत | नरेंद्र मोदींची सेंच्युरी |
सकाळी ९.५० वाजता : नरेंद्र मोदी १२,००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर |
सकाळी ९.४५ वाजता गुजरातमध्ये भाजपची सत्तेकडे वाटचाल | मोदी १२५ चा आकडा पार करणार? असा प्रश्न विश्लेषकांना पडला होता. गुजरातमध्ये भाजप कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत | पार केला शंभरीचा आकडा |
सकाळी ९. ४० वाजता : गुजरातमध्ये भाजप ९४ जागांवर तर हिमाचलमध्ये काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर|
९.२० वाजता : गुजरातमध्ये १०० जागांचे कल हाती | काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर तर भाजप ६७ जागांवर आघाडीवर |
सकाळी ९.१५ वाजता : मणिनगरमूधून नरेंद्र मोदी ८००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर | विसावदरमधून केशूभाई पटेल आघाडीवर | केशूभाई वगळता जीपीपीचे सर्व उमेदवार पिछाडीवर | विसावदरमधून केशूभाई पटेल आघाडीवर | नारणपुरामधून अमित शहा आघाडीवर | नारणपुरामधून अमित शहा आघाडीवर |
सकाळी ९.१५ वाजता : भाजप गुजरातमध्ये ६१ जागांवर तर हिमाचलमध्ये १९ जागांवर आघाडीवर |
सकाळी ९.०० वाजता : गुजरातमध्ये भाजप ३९ जागांवर आघाडीवर | हिमाचलमध्ये भाजप ७ जागांवर आघाडीवर |
सकाळी ८.३० वाजता : मतमोजणीच्या सुरुवातीलाच गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपची आघाडी |
सकाळी ८.०० वाजता : गुजरात आणि हिमाचल विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात |

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा झेंडा
सकाळी १०.२५ वाजता : विधानसभेच्या सगळ्या म्हणजे ६८ जागांचे निकाल हाती | हिमाचल प्रदेश : काँग्रेस ३८ , भाजप २३, इतर ७
सकाळी १०.०६ काँग्रेसची विजयाकडे वाटचाल | ३६ जागांवर आघाडीवर |
सकाळी ९.५५ वाजता : हिमाचल प्रदेश : हिमाचलमध्ये काँग्रेसला बहूमत | हिमाचलमधली सत्ता भाजप गमावणार | हिमाचल प्रदेश : काँग्रेस ३५, भाजप २०, इतर ६