पुन्हा एकदा 'वीरभद्र'च!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी आज सहाव्या वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. वीरभद्र सिंह यांचा शपथग्रहण सोहळा शिमल्याच्या ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 25, 2012, 12:16 PM IST

www.24taas.com, शिमला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी आज सहाव्या वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. वीरभद्र सिंह यांचा शपथग्रहण सोहळा शिमल्याच्या ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
आज शपथ घेणाऱ्यांमध्ये हिमाचल काँग्रेच्या दोन वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. विद्या स्टोक्स आणि ठाकूर कौल सिंह यांनी आज हिमाचल कॅबीनेट पदाची शपथ घेतली.
हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना सोमवारी कोर्टानं भ्रष्टाचार आणि कट रचल्याच्या आरोप करणाऱ्या सीडी प्रकरणातून मुक्त केलं. त्यामुळे त्यांना चांगलाच दिलासा मिळाला होता. सहाव्या वेळेस हिमाचलचं मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या वीरभद्र सिंह यांच्यासाठी ही जणू पर्वणीच ठरली.
७८ वर्षीय वर्षीय वीरभद्र सिंह यांना राज्यपाल उर्मिला सिंह यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. वीरभद्र यांनी १९८३ ते १९८५, १९८५ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि २००३ ते २००७ या कार्यकाळात मुख्यमंत्रिपद भूषवलंय. पाच दशकांच्या आपल्या राजकीय कारकिर्दी वीरभद्र सात वेळा आमदार, पाच वेळा खासदार आणि सहा वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.