वजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.

Updated: Jan 19, 2016, 10:10 PM IST
वजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय title=

मुंबई : वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी ५ सोपे उपाय :

१. मध आणि लिंबू : सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्यावे. यामुळे सारख्या लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण राहाते.  

२. कॉफी आणि लिंबू : अर्धा कप कॉफीमध्ये थोडे गरम पाणी आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण व्यायाम करण्यापूर्वी घ्यावे. यामुळे शरिरातील कॅलरीजही बर्न होण्यास मदत होते.

३. ओवा : कपभर पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा ओव्याचे दाणे टाका. त्यानंतर पाणी अर्ध होईपर्यंत उकळून घ्या. नियमित व्यायाम करून हे प्यायल्याने वजन कमी होते. 

४. दालचिनी : कपभर पाणी उकळून त्यामध्ये १ इंच दालचिनीचा तुकडा मिसळा. १० मिनिटांनंतर हे पाणी गाळून त्यात एक चमच मध मिसळून 30 मिनिटे नाश्टा करण्यापूर्वी प्या. 

५. दुर्वा : मेटॅबॉलिक रेट सुधारण्यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो. दुर्वा वाटून त्याचा रस पाण्यात टाकून प्यायल्याने फायदा होतो.