मुंबई : प्रत्येक संबंध हे प्रेमाच्या आधारावर बनतात. पण ते संबंध टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न केले गेले पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा दोघांच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण एकत्र राहिल्यानंतर दोघांच्या सवयी बदलतात.
तरुण-तरुणी यांच्यामध्येही काही गोष्टींच्या बाबतीत मतभेद असतात.
महिलांना न आवडणाऱ्या 5 गोष्टी :
१. मुलींची नेहमी तक्रार असते की बॉसफ्रेंड त्यांच्याकडे ध्यान देत नाही. मुली बोलत असतात त्यावेळेस मुलाचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं, पण मुलं जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना असं वाटतं की मुलीने त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे.
२. अनेक मुलींची ही तक्रार असते की तिचा प्रियकर तिच्यासोबत वेळ घालवत नाही. अधिक वेळ तो इतर कामांमध्येच व्यस्त असतो. त्याचं कामच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं.
३. जो व्यक्ती कोणतेही निर्णय एकटेच घेतो असा व्यक्तीही मुलींना आवडत नाही. त्यांना वाटतं की त्यांचा जोडीदार त्यांना कमी लेखतो.
४. काही पुरुष घरी आल्यानंतर लगेचच झोपतात. ही सवय महिलांना आवडत नाही. त्यांची इच्छा असते की पुरुषाने काही वेळ त्यांच्या सोबत प्रेमाच्या गोष्टी बोलल्या पाहिजे.
५. प्रत्येक महिलेला असं वाटतं की प्रियकर किंवा पतीने त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे. पती जर दुसऱ्यांची स्तुती करत असेल तर ती महिलेला आवडत नाही.