आपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?

तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.

Updated: Dec 19, 2015, 11:03 PM IST
आपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?  title=

मुंबई : तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.

याचं कारण म्हणजे, बऱ्याचदा आपण आपल्या जोडीदाराला गृहित धरतो... अनेक वेळा आपल्या वाद होतात... भांडण होतात... दोघंही आपल्या मुद्द्यांवर अडून बसतात... त्यामुळे, आपल्या जोडीदाराच्या या वागण्याचा खूप राग येतो... परंतु, एकत्र राहता राहता आणि एकमेकांना समजून घेताना या गोष्टींचा उलगडा हळूहळू होत जातो. जर गर्लफ्रेड आपल्या बॉयफ्रेंडवर चिडली असेल तर ती का? याची काही कारणं असतातच की... पाहा ही तर ती कारणं नव्हती ना... स्वत:च्या आणि आपल्या पार्टनरच्या वागण्याचं आकलन करा... 

- बऱ्याचदा मुलींची तक्रार असते की त्यांचा जोडीदार त्यांना हवंय तितकं अटेन्शन देत नाही.... मुलांना जेव्हा हवं असतं तेव्हा मुलीनं आपल्या सगळ्या गोष्टी ध्यान देऊन अशी मात्र ते अपेक्षा करतात. पण, जेव्हा त्या काहीतरी सांगत असतात तेव्हा मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. 

- आपल्या पार्टनरकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक वेळ कामात व्यतीत करणं... अर्थातच ही एक सवय कुणालाही न आवडण्यासारखीच आहे. काम आणि पैसा म्हणजेच आपल्या जीवनात सर्व काही नसतं, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं.

- घरातल्या अनेक गोष्टींचा निर्णय परस्पर घेऊन टाकणं... या निर्णयांत आपल्या पार्टनरचं काय मत आहे याची बिलकूल पर्वा नसणं... ही एक धोक्याची घंटा आ्रणि वादाचं कारण ठरू शकते.

- बहुतेक वेळा पुरुष सेक्सनंतर लगेचच झोपून जातात. ही सवय मुलींसाठी खूपच निराशादायक असते... त्यांना अशी आशा असते की त्यांच्या पार्टनरनं त्यांच्यासोबत प्रेमाचे दोन शब्द बोलावेत.

- आपला पार्टनर आपली स्तुती करत नाही.... ही समस्या तर अनेकांना भेडसावत असते... आपल्या पार्टनरकडून आपलं कौतुक व्हावं.... आपल्याला महत्त्व मिळावं ही तर आशा अगदी स्वाभाविक अशीच आहे... नाही का?

मग, तुम्हाला काही जाणवतंय का? जाणवत असेल तर आपल्या चुका नक्की दुरुस्त करा...