मुंबई : जेवण बनवताना एखाद्यावेळेस लक्ष नाही दिले तर गॅसवर ठेवलेला पदार्थ करपतो. करपलेलं भाडं साफ करताना मात्र चांगलीच दमछाक होते. आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत ज्यामुळे करपलेली भांडी स्वच्छ करणे शक्य होणार आहे.
१. करपलेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. त्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि २ कप गरम पाणी टाका. हे मिश्रण घेऊन काथ्याने भांडे घासा.
२. एक कच्चा लिंबू घेऊन करपलेल्या भांड्यात रगडा. त्यानंतर गरम पाणी टाका.
३. करपलेल्या भांड्यात मीठ आणि पाणी टाकून ते चांगले उकळवा. त्यानंतर घासणीने भांडे स्वच्छ करा.
४. करपलेल्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कांद्याचे छोटे तुकडे टाकून उकळून घ्या. काही वेळातच करपलेले तुकडे पाण्यावर तरंगतील.
५. अमोनिया आणि पाणी मिक्स करुन ते करपलेल्या भांड्यात टाकून उकळवा. गरम झाल्यानंतर ब्रशने भांडे साफ करुन घ्या.