लंडन : नुकत्याच झालेल्या सर्वेच्या माध्यमातून एक धक्कादायक गोष्टसमोर आली आहे. 20 वर्षाच्या महिलांपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत महिलांची वाढती कंबर ही स्तन कॅन्सरचे लक्षणे दिसून आले आहे. या सर्वेचा अभ्यास सखोल केल्यानंतर असे दिसून येते. की, ‘शरीरातील कोणत्याही अवयवांमध्ये चरबी मेदयुक्त जमा (एडिपोज टिश्यू ) कंबरच्या जवळपास मेटाबॉलिकली जास्त सक्रिय होते’. असे ब्रिटेनच्या यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील भारतीय वंशाचं संशोधक उषा मेनन यांनी सांगितले.
अतिरिक्त एस्ट्रोजन हॉर्मोनचे स्तर वाढविण्याचे काम करते. ज्यामुळे स्तन कॅन्सरच्या पेशींना ऊर्जा मिळते, असेही त्यानी म्हटले. ब्रिटेनमधील यूके कॉलेबोरेटिव ट्रायल ऑफ ओवेरियन कॅन्सर स्क्रीनिंग (यूकेसीटीओसीएम)मध्ये भाग घेणाऱ्या जवळपास 93 हजार महिलांचे परीक्षण केल्यांनतर हे सिद्ध झाले आहे.
या 2005-10 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षणात भाग घेणाऱ्या जास्त करून महिला या 50 वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या होत्या. त्यामध्ये एकही महिला स्तन कॅन्सरने पीडित नव्हती. दरम्यान, 1090 महिलांमध्ये पुढे जाऊन स्तन कॅन्सरचा विकास झाल्याचे दिसून आले आहे. हा सर्वे‘ बीएमजे ओपन’मध्ये प्रकाशित झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.