मुलाच्या जन्मानंतर अशी बदलते सेक्स लाइफ

मुलाच्या जन्मानंतर सेक्स लाइफ पुन्हा रुळावर येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

Updated: Jan 5, 2016, 06:20 PM IST
मुलाच्या जन्मानंतर अशी बदलते सेक्स लाइफ  title=

लंडन : मुलाच्या जन्मानंतर सेक्स लाइफ पुन्हा रुळावर येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. यानंतर जेव्हा बेडरूममध्ये गेल्यावर सेक्सची इच्छा जागृत होते. त्यावेळी एक नवा उत्साह असतो. हा उत्साह पती पत्नीला नव्याने सेक्स करण्यास प्रेरीत करतो. 

सरासरी ५८ दिवसात सामान्य होते सेक्स लाइफ
एकूण ११०० दाम्पत्यांवर अभ्यास करण्यात आला त्यातील ९४ टक्के व्यक्तींनी सांगितले की ते आपल्या सेक्स लाइफमध्ये संतुष्ट आहेत. तर सुमारे ६० टक्के लोकांनी सांगितले की पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांची सेक्स लाइफ चांगली झाली आहे. पण नव्याने आई-बाप झालेल्या जोडप्यांनी सांगितले की पुन्हा सेक्स लाइफ एन्जॉय करण्यासाठी सरासरी ५८ दिवस लागले.

 महिलांना वाटते भीती कारण की... 

ब्रिटनमध्ये एका पॅरेंटिंग साइट चॅनल मम चालविण्याऱ्या संस्थेने हा सर्वे केला आहे. त्यात समोर आले आहे की, पहिल्या मुलानंतर त्यांचा साथीदार पहिले सारखा त्यांच्याकडे आकर्षित होणार नाही, अशी भीती बहुतांशी महिलांच्या मनात असते. कारण मुलाच्या जन्मानंतर महिलांच्या शरिरात बदल होतात. सेक्सुअल अंग आणि स्तनांचा आकार वाढतो. यामुळे आई बनल्यानंतर केवळ १४ टक्के महिलांना आपल्या सेक्स लाइफबद्दल आत्मविश्वास होता.

 

पुरूषांना आठवड्यातून एकदा सेक्स हवा असतो, पण... 

चॅनल ममच्या संस्थापक सियोभान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल होणे हे जीवनातील सर्वात मोठ्या बदलातील एक आहे. त्यामुळे हे खूप आश्चर्यकारक असते की दाम्पत्य कसे एकमेकांजवळ येतात. लग्नानंतर महिलांपेक्षा अधिक पुरूष सेक्ससाठी उत्साहित असतात. नव्याने पिता झालेल्यांना आठवड्यातून दोन वेळा सेक्स करण्याची इच्छा होते. तर महिलांना आठवड्यातून एकदा सेक्स करण्याची इच्छा होते.