मुंबई : हल्लीच्या काळात आप एसीवर खूप निर्भर झालोयत. थोडेसे जरी गरम झाले की एसी सुरु करतो. हल्ली प्रत्येक ऑफिसात एसी असतो ज्यामुळे सतत 8-9 घंटे एसीमध्ये बसून काम करावे लागते. मात्र सतत एसीमध्ये बसून काम करणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे ताप, इन्फेक्शन, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
सांधेदुखी : एसीमधून निघणाऱ्या हवेमुळे सांधेदुखीचे आजार सतावतात.
अॅलर्जीची समस्या - सतत एसीमध्ये बसून राहिल्याने तुम्हाला अॅलर्जी, सर्दी-खोकल्यासारखे आजारही होऊ शकातत. याचे मुख्य कारण म्हणजे एसीमधील फ्लिटर बऱाच काळ साफ केले जात नाही. त्यामुळे त्यातून निघणाऱ्या बॅक्टेरिया आणि धुळीमुळे अॅलर्जी होण्याचा धोका असतो.
थकवा - एसीचे तापमान खूपच कमी असते. ज्यामुळे शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे शरीरात थकवा निर्माण होतो.
त्वचा कोरडी होणे - सतत एसीमध्ये बसून राहिल्याने त्वचा कोरडी पडते. एसीमध्ये नॅचरल हवा बाहेर निघत नाही त्यामुळे त्वचा कोरडी होते.
सायनस - एका संशोधनादरम्यान असे समोर आलेय की, जे लोक सतत 4-5 तास एसीमध्ये बसून असतात त्यांना सायनसची समस्या जाणवते.