मुंबई : आपल्याला निरोगी राहायचे असेल किंवा निरोगी शरीराला बऱ्याच प्रमाणात पोषक तत्वे मिळणे गरजेचे असते. शाकाहारी लोकांनी संपूर्ण पोषक घटक पुरवणाऱ्या खालील गोष्टींचा आहारात समावेश करायलाच हवा.
१. दूध आणि दुधाच्या इतर पदार्थांपासून कॅल्शियम आणि व्हिटामिन 'डी' मिळते. शिवाय अंड्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन्स शरिराला मिळतात.
२. बदाम, पिस्ता, बेदाणे, आक्रोड यांसारख्या काठी कवचाच्या फळांमुळे शरीरातील प्रथिनांची कसर भरून निघते. अळशीच्या बिया शरीरातील अतिरिक्त चरबी हटविण्यास मदत होते. शिवाय शरीरात प्रोटीन, व्हिटामिन, फायबर आणि आयर्न (लोह) जाते.
३. शाकाहारी जेवणात डाळी आणि भाज्या आवश्यक आहेत. डाळीत मसूर आणि सोयाबीनमधून जास्त व्हिटामिन्स आणि कार्बोहायड्रे्डस खनिजे मिळतात.
४. शरिराला आवश्यक असणारे कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेटस मिळण्याचे साधन म्हणजे अख्खे धान्य. शिवाय त्यामधून लोह, झिंक (जस्त) यांसारखी खनिजेही मिळतात. त्यामुळे ओट्स, ब्राऊन ब्रेड, पास्ता, लाल तांदूळ आहारात असावेत.
५. फळ आणि पालेभाज्यांशिवाय शाकाहारी आहार पूर्ण होऊच शकत नाही. ताजी फळे आणि पालेभाज्या नेहमीच्या आहारात असणे गरजेचे आहे.