तुम्हीही इंटरनेटचा वापर करताय तर सावधान, कारण...

तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्यतीत करत असाल तर सावधान... कारण, यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका असतो.

Updated: Oct 8, 2015, 09:24 AM IST
तुम्हीही इंटरनेटचा वापर करताय तर सावधान, कारण...  title=

मुंबई : तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी व्यतीत करत असाल तर सावधान... कारण, यामुळे उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका असतो.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही गोष्ट समोर आलीय. शोधकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे तरुण इंटरनेटवर एका आठवड्यात कमीत कमी 14 तास व्यतीत करतात त्यांचा रक्तदाब अधिक असतो. 

या संशोधनादरम्यान अभ्यास करण्यात आलेल्या 134 तरुणांपैकी 26 तरुणांचा रक्तदाब अधिक होता. इंटरनेटवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाब अधिक असल्याचं यातून स्पष्ट होतंय. त्याचप्रमाणे, इंटरनेट वापराचा सवयी, चिंता, तणाव, लठ्ठपणा आणि सामाजिक भान न राहणं या गोष्टींशीही संबंध दिसून आला. 

'हेन्री फोर्डस डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ सायन्सेस'च्या शोधकर्त्या अॅन्ड्रिया कासिडी बुशरोव यांच्या म्हणण्यानुसार, इंटरनेटचा वापर हा आपल्या जीवनाचा दैनंदिन भाग बनलाय. पण, आपण त्याचा अतिरेक टाळायला हवा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.