'डिप्रेशन'मधून बाहेर पडण्यासाठी टाका एक पाऊल पुढे!

सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय... जुन्या पिढिला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही.

Updated: Oct 7, 2015, 12:34 PM IST
'डिप्रेशन'मधून बाहेर पडण्यासाठी टाका एक पाऊल पुढे! title=

नवी दिल्ली : सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय... जुन्या पिढिला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, तुम्हाला जर तणावामधून बाहेर पडायचं असेल तर आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत प्रत्यक्ष बोलण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकायला तयार राहायला हवं... फोन, व्हॉटसअप आणि ई-मेलवर आपल्या मित्रांशी संवाद न साधता त्यांना प्रत्यक्ष भेटा... आणि त्यांच्याशी संवाद साधा...

ओरेगन हेल्थ अॅन्ड सायन्स यूनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जे लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना नियमितपणे भेट देत राहतात त्यांच्यात तणावाची लक्षणं खूपच कमी प्रमाणात आढळलीत... हेच प्रमाण एकमेकांच्या 'टच'मध्ये राहण्यासाठी 'टेक्नॉलॉजी'चा वापर करणाऱ्यांत मात्र कमी होतं.

समोरासमोर बसून एकमेकांशी संवाद साधल्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.