जमिनीवर बसून जेवण्याचे हे आहेत फायदे

शहरीकरण वाढत गेले तशा घरांच्या रचनाही बदलत गेल्या. हल्ली मध्यमवर्गीय घरांमध्येही डायनिंग टेबल असते. पूर्वीच्या काळी भारतीय घरांमध्ये जमिनीवर बसून संपूर्ण कुटुंबाने एकत्रित जेवण केले जायचे. मात्र जमिनीवरील पाटाची जागा आता डायनिंग टेबलने घेतलीय. मात्र तुम्हाला माहित आहे का डायनिंग टेबलवर बसण्याची सवय आरोग्यासाठी योग्य नाही. 

Updated: Jan 25, 2016, 10:57 AM IST
जमिनीवर बसून जेवण्याचे हे आहेत फायदे title=

मुंबई : शहरीकरण वाढत गेले तशा घरांच्या रचनाही बदलत गेल्या. हल्ली मध्यमवर्गीय घरांमध्येही डायनिंग टेबल असते. पूर्वीच्या काळी भारतीय घरांमध्ये जमिनीवर बसून संपूर्ण कुटुंबाने एकत्रित जेवण केले जायचे. मात्र जमिनीवरील पाटाची जागा आता डायनिंग टेबलने घेतलीय. मात्र तुम्हाला माहित आहे का डायनिंग टेबलवर बसण्याची सवय आरोग्यासाठी योग्य नाही. 

जमिनीवर बसून जेवण कऱण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते. जमिनीवर ताट असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्न योग्य पद्धतीने पचते. जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यास मदत होते. 

तसेच पोट सुटत नाही. अपचन, जळजळ असे पोटासंबंधित विकारही दूर राहतात. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवत असतो तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते. 

मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा थकवा कमी होतो. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरात होणारा रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते.