हिवाळ्यात असा आहार पोषक आहे

 हिवाळा हा म्हटला म्हणजे थंड वातावरण. थंड वातावरणामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये आवश्यक आहे. 

Updated: Jan 14, 2015, 12:34 PM IST
हिवाळ्यात असा आहार पोषक आहे title=

मुंबई :  हिवाळा हा म्हटला म्हणजे थंड वातावरण. थंड वातावरणामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये आवश्यक आहे. 

हिवाळ्यात नेहमीपेक्षा जास्त भूक जास्त लागते. पचन प्रक्रियेचा वेगही वाढतो, त्यामुळे हिवाळ्यात आहाराकडे जास्त लक्ष दिलेलं कधीही चांगलं.
 
हिवाळ्याच स्निग्ध, उष्ण गुणात्मक आहार योग्य ठरतो.
 
दुध, तुप, लोणीचा आहारात समावेश करा, यात मोठ्या प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. या पदार्थ्यांमुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होईल.
 
हिवाळ्यातील आहारात मांसाहारी व्यक्तींनी मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा.
 
आहारामध्ये तीळ, लसून, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र यांचा समावेश असलेला मसाला वापरावा. सर्वात उत्तम उपाय म्हणजे लसणाची, तिळाची चटणी करावी.

बदाम, काजू, मणूका, अक्रोड या सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म आहेत, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करावा.
 
गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खाण्यात असावे.
 
हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा. हिवाऴ्यात कोमट पाणी पिल्याने, पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.