www.24taas.com, झी मीडिया,वॉशिंग्टन
मोबाईल जास्त काळ वापरताय...... जरा जपून. कारण संशोधनानुसार असं निदर्शनास आलंय की मोबाईल जर जास्त वापरला तर ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्याचा आताच विचार करा.
समाचार एजन्सी आरआय नोवोस्तीच्या अभ्यासानुसार सॅंन फ्रॅंसिस्कोमधील अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेंशनच्या वार्षिक बैठकीत झालेल्या अभ्सासानुसार असे निदर्शनास आले की, मोबाईलच्या अधिक वापराने ‘सिस्टोलिक ब्लडप्रेशर’ वाढू शकतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका संभावतो.
इटलीमध्ये केल्या गेलेल्या प्रयोगानुसार असं दिसून आलं की, जेवढा जास्तवेळ माणसं मोबाईल फोनवर बोलतात, त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढतो. तनावाखाली असलेल्या ९४ रूग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी हा निर्ष्कष पुढे आला. अभ्यास करण्यात आलेल्या रूग्णांचे वय ५३ वर्षे होते. अभ्यास करणाऱ्यांनी एक मिनिटाच्या अंतराने रूग्णांचे १२ वेळा रक्तदाब तपासणी केली.
अमेरिकन हार्ट असोसिएशन यांच्या अभ्यासानुसार २० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांचा १२०/८० ब्लडप्रेशर योग्य आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी मोबाईल फोनचा वापर कमीतकमी करावा.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.