मुंबई: शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाइल फोन वापरतात आणि तरुणांना तर गॅझेट्सच वेड आहे. पण ज्यापद्धतीनं हे गॅझेट्स हाताळले जातायत त्यामुळं तुम्हाला मणक्याच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
सकाळी उठल्यापासून ते राञी झोपेपर्यंत मोबाइल पाहताना, त्यावरचे मेसेजेस वाचताना, गेम खेळताना तुम्ही सतत मान खाली करुन मोबाइल पाहता, तसंच मान एका बाजूला वाकवून फोनवर बोलता. हे सर्व करत असताना तुम्ही सर्व्हायकल स्पायनल कॉर्ड या गंभीर आजाराला आमंञण देताय हे तुम्हाला माहितेय का? होय, सतत खाली वाकून मोबाइलकडे पाहिल्यामुळे मानेची झीज होते. त्यामुळं मान दुखण्याचाआजार सुरु होतो
दोन मनक्यामध्ये असलेली डिस्क मागे सरकते त्यामुळं स्पायनल कॉडला दुखापत होते. सर्वायकल स्पॉन्डलायसीस सुरु होते. यामुळं चक्कर येणं, अशक्तपणा,पाय दुखणं,पायाला आणि हाताला मुंग्या येणं, चालायला ञास होवू शकतो.
मानेचे हे सगळे आजार जे आत्तापर्यंत पन्नाशीनंतर सुरु होत होते ते आता तरुणांमध्ये वाढत चालले आहेत. त्याचं कारण मोबाइल असू शकतं. मानेला ञास न पोहचवता मोबाइल कसा वापरला पाहिजे याबाबत ऑर्थोपेडिक डॉक्टर्स काही विशेष सल्ले देतात. ज्यामुळे मानेचे आजार टाळता येवू शकतील.
आजच्या वॉट्स अप आणि फेसबुकच्या जमान्यात आपण मोबाइल आणि इतर गॅझेट्सचा वापर तर टाळू शकत नाही. पण त्यांना चुकीच्या पद्धतीनं वापरल्यामुळं सुरु होणाऱ्या आजारपणाला नक्कीच टाळता येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.