www.24taas.com, झी मीडिया, लंडन
व्यायाम करत आहातं?...मग खाऊन व्यायाम करता की खाण्याच्या आधी?...जर खाऊन झाल्यावर व्यायाम करत असाल तर जरा याकडेही लक्ष द्या. आधी व्यायाम, मग न्याहारी..तब्बेत लई भारी.. काही खास माहिती.
एका अभ्यासातून स्पष्ट झालयं की, सकाळी नियमित लवकर उठून नाश्ता करण्याआधी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा नाश्त्यानंतर व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेत शरीराचा लठ्ठपणा २० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. रात्रभर रिकामं पोट राहल्यावर सकाळी उठल्यानंतर व्यायाम केल्याने आपली भूक वाढते आणि आपण जास्त खातो. हे अभ्यासा अंती स्पष्ट झाले आहे.
शास्त्रज्ञानी या अभ्यासाच्या दरम्यान १२ लोकांना सकाळी दहा वाजता ट्रेडमिलवर थोडा वेळ व्यायाम करायला सांगितला. त्यामध्ये सकाळी नाश्त्याच्या आधी व्यायाम करणारे आणि नाश्त्यानंतर व्यायाम करणारे अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा समावेश होता. व्यायामानंतर त्या सगळ्यांना चॉकलेट मिल्कशेक देण्यात आलं त्यानंतर दुपारच्या जेवणात पास्ता देण्यात आला. तसेच सहभागकर्त्यांना पोट भरून खाण्याची सूचना देण्यात आली.
नाश्ता न करता व्यायाम करणाऱ्या सहभागकर्त्यांना दिवसभरात जास्त खाण्याची आवश्यकता भासवली नाही असं शास्त्रज्ञ एम्मा स्टीवनसन आणि जेवियर गोन्जालेज यांच्या टिमने या अभ्यासातून निष्कर्श काढला. या अभ्यासातून असही लक्षात आलं की, काही न खाता व्यायाम करणाऱ्या सहभागकर्त्यांचे २० टक्के कॅलरी कमी करण्यात यशस्वी ठरले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.