शरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा

दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.

Updated: Dec 8, 2015, 04:53 PM IST
शरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा

मुंबई : दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.

मधामधून व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-6, बी-12 तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एच आणि के या गोष्टी मिळतात. दुधामधून हिटॅमिन ए, बी, सी, डी, कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड या गोष्टी मिळतात. 
 
दुध आणि मध एकत्र सेवन केल्यास होणारे फायदे :

1. मध आणि दुध हे सुक्ष्मजीवांना नष्ट करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि स्किन ग्लो होण्यास मदत होते. दोन्ही एकत्र करुन अंघोळी आधी शरीराला लावल्याने स्किन उजळते.

२. नियमित याचे एकत्र सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते. अतिसेवन करू नये. 

३. मध आणि दुधामध्ये रोगप्रतिकार शक्ती म्हणून काम करते. सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून दूर राहाल.

४. दूध आणि मध सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो. रोमन, इजिप्त, भारत या देशात दिसण्यासाठी एक अँटीएजिंगम्हणून याचा वापर होत होता.

५. दूध आणि मध एकत्र घेतल्याने  मेंदुला आराम मिळतो. झोप न लागण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.