मुलांसमोर या 5 गोष्टी कधीच करू नका

कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसंच मुलांवरही काही संस्कार व्हावे यासाठी त्यांना आकार द्यावा लागतो. लहान वयातच मुलांवर संस्कार केले जाऊ शकता. लहान वयात मुलं घडत असतात आणि मोठ्यांचं अनुकरण करत असतात. 

Updated: Dec 13, 2015, 09:56 PM IST
मुलांसमोर या 5 गोष्टी कधीच करू नका title=

मुंबई : कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसंच मुलांवरही काही संस्कार व्हावे यासाठी त्यांना आकार द्यावा लागतो. लहान वयातच मुलांवर संस्कार केले जाऊ शकता. लहान वयात मुलं घडत असतात आणि मोठ्यांचं अनुकरण करत असतात. 

मुलांवर काही वाईट गोष्टींचा परिणाम होऊ नये त्यासाठी फक्त या 5 गोष्टी करा.

1. शिव्या आणि अपशब्द टाळा : बोलण्यापूर्वी विचार नक्की करावा की आपल्या आजूबाजूला लहान मुलं तर नाहीत ना. 5-16 वयोगटातील मुलांची आकलनक्षमता चांगली असते. त्यामुळे ते कोणत्याही गोष्टी लगेचच उचलतात. त्यामुळे त्यांच्या समोर अपशब्द बोलणं टाळा. 

2. नकारात्मकता टाळा : लहान मुलांची निरीक्षणक्षमता खूपच चांगली असते. लहान मुलं आजूबाजूच्या लोकांप्रमाणेच घरातील व्यक्तींचेदेखील अतिशय जवळून निरीक्षण करत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्या- बोलण्याचा मुलांवर परिणाम होत असतो. ‘नाही होणार’,’नको करूयात’, ‘अशक्य आहे’ अशा सतत नकारात्मक शब्द बोलणं टाळा. 

3. राग व्यक्त करू नका : मुलांसमोर पालकांनी भांडण करणं, रागात मोठ्याने बोलणं, मारहाण करणं यासारख्या गोष्टी टाळाव्यात. मुलंदेखील नंतर अशाच प्रकारे राग व्यक्त करण्याची शक्यता असते. 

4. ग़ॉसिप करणे टाळा : मुलांसमोर कोणाचीही चुगली करणं किंवा गॉसिप करणं टाळा. मुलांना आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने गोष्टींची जाणीव करून द्या. 

5. भीती घालून देऊ नका : असं केल्याने हे होईल. तसे केल्याने हे घडेल अशी चुकीची भीती मुलांना घालून देऊ नका. मूर्ख, वाईट असे शब्द वापरू नका. मुलांकडून काहीही चूक झाली तर त्यांच्यावर लक्ष ठेवा पण चूक सुधरवण्यासाठी त्यांना वेळ द्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.