सावधान! तुम्ही रोज डिओड्रंट तर वापरत नाही ना?

सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वाधिक वापर हा डिओड्रंटचा केला जातो. शरीराची दुर्गंधी घालवण्यसाठी डिओड्रंटचा वापर नियमितपणे केला जातो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की डिओड्रंटचा रोजचा वापर तुमच्या शरीरासाठी किती हानिकारक ठरु शकतो. 

Updated: Dec 24, 2015, 10:22 AM IST
सावधान! तुम्ही रोज डिओड्रंट तर वापरत नाही ना? title=

नवी दिल्ली : सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वाधिक वापर हा डिओड्रंटचा केला जातो. शरीराची दुर्गंधी घालवण्यसाठी डिओड्रंटचा वापर नियमितपणे केला जातो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की डिओड्रंटचा रोजचा वापर तुमच्या शरीरासाठी किती हानिकारक ठरु शकतो. 

डिओड्रंटच्या वापराने केवळ तुमच्या स्किनवरच फरक पडत नाही तर तुमच्या स्वास्थ्यावरही त्याचा प्रभाव पडतो. तुम्ही मार्केटमधून जो डिओड्रंट घेता त्यात केमिकल आणि टॉक्सिन असते. 

डिओड्रंटमुळे कॅन्सरसाखरा भीषण आजारही होऊ शकतो. डिओड्रंटमुळे स्वेद ग्रंथी म्हणजेच टॉक्सिन बाहेर निघणाऱ्या ग्रंथी बंद होतात. हे कारण कॅन्सरला कारणीभूत ठरु शकते. 

तसेच न्यूरोटॉक्सिनमध्ये अल्युमिनियम यौगिक असते ज्यामुळे अस्थमा, अल्झायमरची समस्या उद्भवू शकते. या समस्या न होण्यासाठी डिओड्रंट म्हणून एखाद्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करा अथवा त्याचा वापर कमी करा.