मुंबई : तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले अधिक केस असतील तर त्यामुळे तुमचं सौंदर्य फिकं वाटत असेल... ही समस्या तुमचा आत्मविश्वासही कमी करू शकते. घाबरु नका... हीच समस्या अनेकांना असते... आणि त्यावर साधे-सोप्पे उपायही आहेत.
ही समस्या उद्भवते ती तणावामुळे... काही वेळा ही समस्या अनुवांशिक असते तर काही वेळा असंतुलित हॉर्मोनल्समुळेही चेहऱ्यावर केस दिसून येतात.
यासाठी तुम्ही अनेकदा ब्लिच केलं तर चेहऱ्यावरचं खराखुरं तेज निघून जाऊ शकतं. शिवाय, नेहमी-नेहमी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करणंही शक्य नसतं... अशा वेळी काही घरगुती उपाय वापरून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.
संत्र्याची साल आणि दह्याची पेस्ट
संत्र्याची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. याच्या वापरामुळे चेहरा तजेलदार दिसतो. सोबतच चेहऱ्यावर दिसणारे केसही विरळ होत जाता. जर तुम्हाला आणखी परिणामकारक उपाय हवा असेल तर संत्र्याच्या सालांत दही आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून ही पेस्ट दररोज चेहऱ्याला लावा. यामुळे, तुमची पिंपल्सपासूनही सुटका होईल.
पपई आणि हळदीची पेस्ट
पपई हा एक नॅचरल ब्लीच आहे. याच्या वापरानं चेहऱ्याचा रंग उजळतोच पण चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांचा रंगही हलका होऊन जातो. तुम्हाला हवं असल्यास पपईत थोडी हळदही मिसळून ही पेस्ट दररोज चेहऱ्याला लावू शकता. ही पेस्ट वापरताना थोड्या वेळ पेस्टनं चेहऱ्याला मसाज करा आणि त्यानंतर १५-२० मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा... आणि मग चेहरा पाण्यानं धुवून घ्या... परिणाम तुम्हाला दिसून येईल.
लिंबूचा रस आणि मध
चेहऱ्यावरच्या केसांचा रंग हलका करण्यासाठी आणि चेहरा तजेलदार बनवण्यासाठी मध आणि लिंबूचा रस मिसळून चेहऱ्याला लावा. रोज हे मिश्रण कमीत कमी १० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा. काही दिवसांतच तुम्हाला याचे फायदे लक्षात येतील.
टोमॅटोचा रस
याशिवाय तुम्ही दररोज जेवणात वापरणारा टोमॅटोही चेहऱ्यासाठी वापरू शकता. टॉमेटो थोडा कापून किंवा त्याची पेस्ट बनवून त्यानं चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करा... पेस्ट थोड्या वेळ लावून ठेवा... आणि त्यानंतर चेहरा पाण्यानं धुवून घ्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.