चेहऱ्यावर मुरूमांनी वैतागले, हे सात उपाय

 तुमच्या चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ आहे का? तुम्ही यापासून खूप वैतागले आहात का?  आता निराश होण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहे. ते केल्यास तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकाल. 

Updated: Dec 9, 2015, 05:30 PM IST
चेहऱ्यावर मुरूमांनी वैतागले, हे सात उपाय  title=

मुंबई :  तुमच्या चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ आहे का? तुम्ही यापासून खूप वैतागले आहात का?  आता निराश होण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहे. ते केल्यास तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकाल. 

१) डायट पूर्णपणे बदला :  मुरूम कंट्रोल करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमचे डायट संपूर्णपणे बदलले पाहिजे. तुमच्या डायटमध्ये एक्सपर्टने सांगितलेल्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे. आहारात मासे, अक्रोड, आळशीच्या बिया तुम्ही रोज खाल्ल्या पाहिजे. त्यामुळे खूप फायदा होता. 

२) झोप पूर्ण करा : चेहऱ्यावर पूरळ किंवा मुरूमांची समस्या होऊ नये असे वाटत असेल तर तुमची झोप होणे गरजेचे आहे. चांगला आहार आणि चांगली लाइफ स्टाइल तुमची मुरूमांपासून कायमची सुटका करू शकते. 

३) खूप पाणी प्या : तुमच्या त्वचेला चांगले ठेवायचे असेल तर खूप पाणी प्यायले पाहिजे. यामुळे नेहमी त्वचा हायड्रेट राहते आणि शरीरात रक्ताचा फ्लो कायम राहतो. पाण्याशिवाय असे फळ किंवा बाज्या करू शकतात, की ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवसात तुम्ही ८ ग्लास पाणी प्यायला पाहिजे. 

४) मेवा खा : बदाम, अक्रोड आणि ब्राझील नट्समध्ये सिलीयम असते त्यामुळे त्वचेच्या कोशिका सूजत नाही त्वचेत लवचिकता निर्माण होते. 

५) व्हिटामिन ई : मुरूमांमुळे होणारे डाग व्हिटामिन ई युक्त खाद्य पदार्थ खाल्याने नष्ट होता. त्यामुळे अंडी, कडधान्य, मेवा, अनरिफाइंड तेलाचा उपयोग करा. 

६) टॉमॅटो खा :  खूप टॉमॅटो खाल्ले पाहिजे, पण ते पिकलेले पाहिजे. टॉमॅटो खाल्ल्याने त्वचेला ग्लो येतो. त्यात खूप सारे एंटीऑक्साडेंट आहे. 

७) राजमा : राजमा खाल्याने मुरमांवर लगाम लावला जातो. त्यात झिंक असते. त्यामुळे मुरूम निर्माण होत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.