उन्हाळ्यात चिंच खाण्याचे पाच फायदे

नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुशखबरच ठरू शकेल. केवळ चवीपुरती नाही तर उत्तम आरोग्यासाठीही चिंच अत्यंत उपयोगी ठरते... 

Updated: Mar 17, 2016, 08:26 AM IST
उन्हाळ्यात चिंच खाण्याचे पाच फायदे title=

मुंबई : नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुशखबरच ठरू शकेल. केवळ चवीपुरती नाही तर उत्तम आरोग्यासाठीही चिंच अत्यंत उपयोगी ठरते... 

भूक वाढते

पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत. पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं.

पोट साफ होण्यासाठी... 

चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर कुसकरून ते पाणी गाळून घ्यावं. पाणी अर्ध आटवावं. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा. हे सरबत रात्री प्याल्यानं सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार/सवय दूर होते.

पोटाचे आजार दूर होतात

चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.

जुलाबावर गुणकारी

रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.

पोटदुखीवर उपाय

चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ २/२ या प्रमाणात घ्याव्या.