या पाच घरगुती उपायांनी करा झटपट वजन कमी

अनेकांना वाढलेल्या वजनामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. तर बरेच जण वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रयोग करतात. मात्र याचा परिणामकारक फायदा काहींना होतो तर काहींना नाही. यामुळे जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी परिणामकारक उपाय...

Updated: Mar 16, 2016, 10:18 PM IST
 या पाच घरगुती उपायांनी करा झटपट वजन कमी

मुंबई : अनेकांना वाढलेल्या वजनामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. तर बरेच जण वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रयोग करतात. मात्र याचा परिणामकारक फायदा काहींना होतो तर काहींना नाही. यामुळे जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी परिणामकारक उपाय...

वजन वाढविणे सोपे असते पण वजन कमी करणे खूप अवघड गोष्ट असते.  पण हे अवघड काम सोपे करण्यासाठी हे पाच घरगुती उपाय आहेत. 

दुर्वाचा रस 

शरीर डीटॉक्स करण्यासोबतच मेटॅबॉलिक रेट सुधारण्यासाठी 'दुर्वाचा रस' जरुर प्यावा. मूठभर ताज्या दुर्वा पाण्यात वाटून त्याचा रस नियमित सकाळी घ्यावा.

कोमट पाणी आणि मध लिंबू 

सकाळी ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात चमचाभर मध मिक्स करुन घ्यावे. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते व अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते. परिणाम वजन घटण्यास मदत होते.

दालचिनीचा काढा

कपभर उकळत्या पाण्यात १ इंच दालचिनीचा तुकडा मिसळा. १० मिनिटांनंतर हे पाणी गाळा. त्यात चमचाभर मध मिसळून ब्रेकफास्टपूर्वी अर्धा तास प्या. यामुळे वजन घटण्याची प्रक्रिया लवकर होते.

ओव्याचे पाणी 

कपभर पाण्यात चमचाभर ओव्याचे दाणे मिसळून पाणी निम्मे होईपर्यंत उकळून प्या. तसेच नियमित व्यायाम करा. 

कॉफी आणि लिंबू 

अर्धा कप कॉफीत थोडेसे गरम पाणी व चमचाभर लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण व्यायामापूर्वी प्यावे. यामुळे मेटॅबॉलिक रेट सुधारण्यास मदत होते तसेच कॅलरीजही बर्न होतात.