नवी दिल्ली : प्रत्येकाला आयुष्यभर तरूण दिसायला आवडतं, फक्त महिलाच नाही पुरूषांनाही तरूण दिसायला आवडतं. सुंदर तजेलदार त्वचा असणाऱ्यांची खुबी आहे, योग्य आहार आणि नियमित जीवनशैली. जर तुम्ही हे संतूलन पाळलं तर म्हातारपण लवकर तुमच्या जवळ येणार नाही, हे देखील तेवढंच खरं.
फळ आणि हिरव्या भाजीपाल्यांशिवाय काही अशा वस्तू आहेत, की ज्यामुळे तुम्ही जास्तच जास्त काळ तरूण दिसतात.
अॅवोकाडो : अॅवोकाडोमध्ये विटामीन ई मोठ्या प्रमाणात आहे, याशिवाय अॅवोकाडोमध्ये असणारं अॅण्टीऑक्सिडेंट त्वचेसाठी फारच लाभदायक आहे. अॅवोकाडो स्किन सेलला रिजनरेट करतो. स्किन सेल रिजनरेट झाल्याने त्वचेत तजेलदारपणा येतो, आणि तुम्ही तरूण दिसायला लागतात.
किडनी बीन्स म्हणजेच राजमा : राजमामध्ये फायबर आणि पॉटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात. शरीरातील मोठ्या कोलेस्ट्रॉलला दूर करण्यात राजमा मदत करतो. हार्टच्या रूग्णांसाठी राजमा अतिशय लाभदायक आहे. शोधकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजमामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होतं. किडनी बिन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं, जे शरीरासाठी लाभदायक असतं.
डार्क चॉकलेट : डार्क चॉलेटमध्ये 70 टक्के कोको असतं, ते प्रोटीन आणि विटामिन-बीचा खजिना मानलं जातं. अशा प्रकारचं चॉकलेट खाल्याने फॅट बर्न होत असल्याचं सांगण्यात येतं, त्वचा आणि केसाचं आरोग्य सुधारतं.
ब्रोकोली : ब्रोकोली फायबर आणि विटामिन-सीचा सोर्स आहे. ब्रोकोली वजन कमी करण्यास सहाय्यक नसलं, तरी हार्टच्या आजारात अतिशय फायदेशीर असते.
ब्लूबेरी : ब्लूबेरीमध्ये विटामान-सी जास्त प्रमाणात असतं, यामुळे रक्ताचं सर्कुलेशन सुधारतं. ब्लूबेरीमध्ये अॅण्टी मिनरल्स असतात, ज्यात म्हातारपण कमी करण्याचे गुण अशतात, ब्लूबेरीमध्ये पोटेशियमचं प्रमाण जास्त असतं.