नवी दिल्ली: देशात झपाट्यानं वाढत असलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या पाहता आहारतज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या बाबी सुचवल्या आहेत. जर आपल्या आहारात या खाद्यपदार्थांचा समावेश केला तर स्वाइन फ्ल्यूच्या संक्रमणापासून आपण बचाव करू शकतो. स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत देशात ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.
ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते अशाच रुग्णांमध्ये स्वाइन फ्ल्यूचं संक्रमण वाढत असल्याचं न्यूटी हेल्थ सिस्टम्सच्या आहार तज्ज्ञ शिखा शर्मा यांनी सांगितलंय. त्या म्हणाल्या अँटी ऑक्सिडंट तत्त्वांनी परिपूर्ण असे खाद्यपदार्थांचा सेवन केल्यानं रोग प्रतिकारक शक्तीत वाढ केली जावू शकते. ताजी फळं आणि पालेभाज्या मोठ्या प्रमाणात खाव्यात.
रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला शिखाने दिला. ताजे गाजर, आवळा आणि पालकाच्या ज्यूस प्यायल्याने पण H1N1 विषाणूशी लढण्यास मदत मिळते. तसंच तुळस, लसूण आणि हळदीसारखे पदार्थही उपयुक्त ठरतात.
भूक न लागणं हे सुद्धा स्वाइन फ्ल्यूचं एक लक्षण असू शकतं. त्यामुळे खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. संक्रमित व्यक्तींनी आपण खाल्लेला पदार्थ दुसऱ्यांशी शेअर करू नये. तसंच चहा, कॉफीपासून बचाव करावा.
एजंसी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.