मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका

Updated: Nov 28, 2015, 06:01 PM IST
मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका   title=

 

न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

बोस्टनच्या हार्वर्ड महाविद्यालयातील मेडिकल विषयामध्ये झालेल्या एका संशोधनात असे निरीक्षणास आले की, मधुमेह झालेल्या महिलांना हृद्याशी संबंधीत आजार फार लवकर होतो. ६४ वयापर्यंतच्या १,१४,५३७ महिलांचा या संशोधनाच्या वेळी निरीक्षण करण्यात आले.

हार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी

१९८९ ते २००६ पर्यंत चाललेल्या संशोधनात असे निरीक्षण हाती आले की, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या महिलांना हृदयाशी संबंधित आजार लवकर होतात. हे सर्व होण्यास वायू प्रदूषण कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. कारखाने, वाहने, वीज निर्मिती केंद्र यांच्या मधून निघणाऱ्या धुरातील कणांचे ही परीक्षण केले आहे.

हार्ट अॅटॅकपासून वाचायचं आहे, जोडीदाराचं ऐका!

संशोधन पूर्ण झाल्यानंतर असे समोर आले, ज्या महिलांना मधुमेहाचा आजार आहे. त्यांना इतर महिलांनच्या तुलनेत हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते. या विषयीचा संपूर्ण लेख 'अमेरिकन हॉट एसोसिएशन' या मासिकामध्ये छापण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.