गुड न्यूज: डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी

महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगानं फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीनं तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळं पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतातही उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

Updated: Nov 3, 2014, 12:05 PM IST
गुड न्यूज: डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी title=

पॅरिस: महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगानं फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीनं तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळं पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतातही उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

सॅनोफी पाश्चर या कंपनीनं गेल्या वर्षी डेंग्यूवर लस तयार केली होती. आशियाई देशांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच फ्रेंच कंपनीनं तयार केलेली ही लस दिलासा देणारी ठरली होती. या लशीची भारतातील चाचणी नुकतीच पार पडली. यात दिल्ली, बंगळुरु, पुणे आणि कोलकाता इथल्या १८ ते ४५ वयोगटातील रुग्णांना ही डेंग्यूरोधक लस देण्यात आली होती. या चाचणीत ही लस भारतातही उपयुक्त ठरु शकते हे स्पष्ट झाले आहे.

कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. निकोलस जॅक्सन म्हणाले, भारतात या लशीची यशस्वी चाचणी केल्यानंतर आम्ही भारतातील संबंधीत सरकारी यंत्रणांच्या संपर्कात असून लवकरच या लशीची भारतातही नोंदणी केली जाईल. आता भारतात स्वस्त दरात ही लस उपयुक्त करुन देणं गरजेचं असून यावर सरकार आणि कंपनी काय तोडगा काढतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेतील एका अहवालानुसार भारतात दरवर्षी ६० लाख डेंग्यूचे रुग्ण आढळतात.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.