लखनऊ : तुमच्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्राहसलेले आहे. त्यामुळे या समस्येमुळे तुमचा स्मार्टनेस कमी होतो. त्यावर एक सोपा उपाय आहे.
काळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच अन्य कारणांने डोळ्याच्या खाली काळे डाग दिसतात. हे काळे डाग घालविण्यासाठी घरगुती सोपा उपाय आपण करु शकता.
आपल्या डोळ्याखालील काळे डोग घालविण्यासाठी काकडीचे गोल खाप म्हत्वाची भूमिका बजावते. तसेच डोळांना आरामही मिळतो. काकडीची खाप चांगले क्लिंनजर आहे. डोळ्यांखाली काळे वर्तुळ जाण्यास मदत करते. काकडीची गोल खाप करुन दिवसातून दोन ते तीन वेळा १० मिनिटे ठेवा.
तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे डोळ्याखाली काळे डाग तयार होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या. विश्रांती ही महत्वाची आहे. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन काळे पडणार नाहीत.
सकाळी चहा केल्यानंतर तुम्ही जे चहाचे छोटे कण (चोथा) फ्रिजमध्ये ठेवा त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्याखाली हलक्या हाताने चोळावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्वचेला ग्लो प्राप्त होता. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाटा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.
बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळी त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.