डोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!

डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा. 

Updated: Dec 17, 2015, 10:49 PM IST
डोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!

मुंबई : डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा. 

टोमॅटो
टोमॅटोच्या रसात थोडात लिंबाचा रस, थोडसं बेसनपीठ आणि हळद मिसळवा... आणि ही पेस्ट डोळ्यांभोवती २० मिनिटांपर्यंत लावून ठेवा. आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग नक्की करून पाहा

बटाटा
अतिशय उपयोगी असा हा उपाय आहे. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छपणे धुवून घ्या. त्यानंतर बटाट्याची पातळ - पातळं स्लाईस करून त्यांना आपल्या डोळ्यांवर २०-२५ मिनिटांपर्यंत ठेवा... त्यानंतर चेहरा साफ करून घ्या

गुलाब पाणी
गुलाब पाण्याच्या मदतीनं डार्क सर्कलच्या समस्येपासून लवकर सुटका होऊ शकते. बंद डोळ्यांवर गुलाब पाण्यात भिजवलेल्या कापसाचा तुकडा १० मिनिटांपर्यंत ठेवून द्या... आणि मग पाहा परिणाम... 

बदामाचं तेल
डोळ्यांखालची काळी वर्तुळं दूर करण्यासाठी बदामाचं तेल खुपच फायदेशीर आहे. बदामाचं तेल डोळ्यांच्या आजुबाजुच्या भागात लावून काही वेळ तसंच राहू द्या. त्यानंतर बोटांनी १० मिनिटांपर्यंत डोळ्यांना हलका मसाज द्या. त्यानंतर चेहरा साफ करून घ्या.

टी बॅग
डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी वापरलेल्या टी-बॅग्सचाही वापर करू शकता. टी-बॅग्समध्ये असलेले टॅनिन डोळ्यांच्या आजुबाजुची सूज आणि त्वचेचा काळसरपणा पूर्ववत करण्यासाठी मदत करतं.

पुदीन्याची पानं
पुदीन्याची पानं चुरगाळून त्यांना डोळ्यांवर आणि आजुबाजूच्या भागावर काही वेळापर्यंत ठेवून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यानं डोळे धुवून घ्या. 

संत्र्याचा रस आणि ग्लिसरीन
संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणत विटॅमिन सी असतं... हे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. संत्र्याच्या रसात थोडसं ग्लिसरीनचे थेंब मिसळून ही पेस्ट दररोज डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डार्क सर्कल लवकर दूर होतील.

ऑलिव्ह ऑईल
डोळ्यांचे काळे घेरे दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचाही उपयोग होतो. बोटांवर ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घेऊन हलक्या हातानं मालिश केल्यानं रक्तसंचारही व्यवस्थित राहतो आणि डोळ्यांनाही आराम मिळतो.