मध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे

मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा. 

Updated: Sep 7, 2016, 04:19 PM IST
 मध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे

मुंबई: मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा. 

आजारांना शरीरापासून लांब ठेवण्यासाठी या पदार्थांचा मोठा उपयोग होतो. आठवड्यातून दोन वेळा मध आणि दालचिनी पावडर पाण्यात टाकून प्यावे.

या आजारांवर मध आणि दालचिनी पावडर मात करतो

1. कॅन्सर: मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायल्याने, शरीरात कॅन्सर सेल्सची निर्मिती होत नाही आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.

2. हृद्य: शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी पावडरचे पाणी अतिशय उपयोगी पडते. या पाण्याने हृद्यरोगचा धोका टळतो.

3. फॅट: वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातील फॅट कमी होण्यासाठी रोज एक कप मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्या.

4. सर्दी खोकला: मध आणि दालचिनीच्या पाण्याने शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी खोकला आटोक्यात येतो. 

5. डोकेदुखी: रोज एक ग्लास मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायल्याने डोकेदुखी कमी होते.