पाहा २० मिनिटात कशी सुधारणार स्मरणशक्ती?

Updated: Oct 7, 2014, 03:09 PM IST
पाहा २० मिनिटात कशी सुधारणार स्मरणशक्ती? title=

नवी दिल्लीः एखादी गोष्ट तुमच्या लक्षात राहत नसेल. तर काळजी करू  नका. कारण जिमला गेल्याने तुमची मेमरी स्ट्राँग होऊ शकते.

मेमरी स्ट्राँग करायची असेल तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हणजे एका सर्व्हेद्वारे असे सांगण्यात येतंय की, २० मिनिटं व्यायाम आणि वेट लिफ्टिंग केल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.  

अनेक अभ्यासातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, महिनाभर अॅरोबिक अक्ससाइझ तुमची स्मरणशक्ती वाढवू शकते. पण, जॉर्जिया इंस्टीट्यूटने केलेल्या अभ्यासातून त्यांना असं कळलंय की, वेट लिफ्टिंगने सुद्धा तुमची स्मरणशक्ती स्ट्राँग करू शकतात.

हा सर्वे करण्यासाठी त्यांनी एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यात त्यांनी स्पर्धेकांना एक कम्प्यूटरच्या माध्यमातून ९० फोटोची एक सीरिज दाखविण्यात आली होती. यामध्ये सर्व फोटोना एकसमान स्वरुपात, लहान मुलांचे फोटो आणि पॉझिटिव सोबत निगेटिव फोटो सुद्धा दाखविले गेले. यामध्ये सामान्यांच्या तुलनेत व्यायाम आणि वेट लिफ्टिंग करणाऱ्या स्पर्धेकांची स्मरणशक्ती जास्त स्ट्राँग दिसून आली.

या प्रॉजेक्टची लीडर ही जॉर्जिया टेकची विद्यार्थ्यांनी लिसा वेनबर्गच्या मते, लोकांना मेमरी स्ट्राँग करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. फक्त २० मिनिटं व्यायाम आणि वेल लिफ्टिंग स्मारणशक्ती सुधारू शकते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.