होळीच्या रंगापासून बचाव करण्यासाठी काय कराल?

होळी स्पेशलः होळीच्या निमित्ताने तुमच्या त्वेचेची काळजी घेण्यासाठी काही विशेष टिप्स होळी, रंगाची चौफेर उधळण करणारा सण उद्यावर येऊन ठेपला आहे.परंतु हेच रंग तुमच्या त्वचेची आणि केसांची हानी करु शकतात.आम्ही तुमच्यासाठी काही विशेष टिप्स घेऊन आलोय जेणेकरुन तुमची ही होळी सुरक्षित आणि आनंदात साजरी होईल.

Updated: Mar 26, 2013, 02:28 PM IST

www.24taas.com, मुंबई
होळी, रंगाची चौफेर उधळण करणारा सण उद्यावर येऊन ठेपला आहे.परंतु हेच रंग तुमच्या त्वचेची आणि केसांची हानी करु शकतात.आम्ही तुमच्यासाठी काही विशेष टिप्स घेऊन आलोय जेणेकरुन तुमची ही होळी सुरक्षित आणि आनंदात साजरी होईल.
होळीच्या निमित्तानं तुमच्या त्वेचेची काळजी घेण्यासाठी काही विशेष टिप्स
-होळी खेळायला जाण्यापूर्वी आणि खेळून आल्यावर तुमच्या त्वचेवर सनस्क्रीन किंवा मॉईश्चरायजर लावायला विसरू नका.
-त्वचेवर लावायला ऑलीव्ह ऑईल, नारळाचं तेल आणि मस्टर्ड ऑईलचा वापर करा.
-केसांना नारळाचं किंवा ऑलिव्ह ऑईल वापरा. त्यामुळे रंगातील रसायनांपासून होणाऱ्या केसांच्या हानीपासून बचाव होईलं आणि केसांतून ते रंग का़ढण्यास मदत होईल.
-ओठांची काळजी घेण्यासाठी लीप ग्लॉस किंवा लीप बामचा वापर करा.
-हाताच्या आणि पायांच्या नखांची काळजी घेण्यासाठी होळी खेळायला जाण्यापूर्वी पारदर्शक किंवा लाल रंगाचं नेलपॉलिश लावा
-होळी खेळायला जाण्यापूर्वी त्वचेला टोनर लावा जेणेकरून तुमच्या त्वचेची छिद्रे झाकली जातील.
- पूर्ण बाह्यांचे कपडे घालूनही तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकाल.
-होळी खेळताना किंवा खेळून झाल्यावर उन्हात बसू नका. त्यामुळे रंग काढण्यास त्रास होतो तसेच त्वचेची हानीही होते.
-हळद, झेंडूची फूल, टॉमेटो,चहाच्या पानापासून बनवलेल्या रंगांचा वापर करा.
- खेळून झाल्यावर तोंडाची त्वचा क्लिन्सिंग मिल्कने स्वच्छ करा. धुळवड खेळून झाल्यावर लगेचच साबणाचा वापर टाळा.

- बाहेर पडायच्या अगोदर तुम्ही तीळाच्या तेलाने त्वचेला मसाज करू शकाल जेणे करून रंग निघण्यास मदत होईल.
-खेळून झाल्यावर केस हर्बल किंवा नॅसर्गिक शॅम्पूचा वापर करा आणि शेवटी लिंबाचा रस केसांना लावा जेणेकरून केसांची झालेली हानी भरून निघेल.
-केसांना दही, हळद आणि हिना याचा पॅक लावावा.
-खेळून आल्या-आल्या अंघोळ करू नये त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते.